एक्स्प्लोर
Gadchiroli Maoist Surrender : 'माझ्यासह ६० माओवादी शरण आले', Sonu उर्फ Bhupati यांचा मोठा खुलासा
गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई झाली असून, माओवादी पॉलिटब्युरो आणि सेंट्रल कमिटी मेंबर मलोजुल्ला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपतीसह ६० माओवादी कॅडरने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील माओवाद्यांच्या हालचालींवर मोठा परिणाम होणार आहे. 'माझ्यासह ६० माओवादी शरण आले', असं सोनू उर्फ भूपतीने स्पष्ट केलं आहे. गडचिरोली पोलिसांच्या या अभूतपूर्व यशामध्ये गृह मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाची महत्त्वाची भूमिका असल्याचंही अधोरेखित करण्यात आलं आहे. भूपती हा केवळ माओवादी लीडर नव्हता, तर तो प्रवक्ता आणि स्ट्रॅटेजिस्टही होता. या सामूहिक शरणागतीमुळे माओवाद्यांच्या संघटनेला मोठा धक्का बसला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement














