Chhatrapati Sambhajinagar Dowry : हुंड्यासाठी महिलेला चटके देऊन मारहाण केली, फुलंब्रीत संतापजनक घटना
Chhatrapati Sambhajinagar Dowry : हुंड्यासाठी महिलेला चटके देऊन मारहाण केली, फुलंब्रीत संतापजनक घटना
Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय .माहेरून पैसे घेऊन ये असं म्हणत तीस वर्षीय विवाहितेला घरात बांधून बेदम मारहाण करण्यात आली .एवढेच नाही तर दोरीने बांधून चटके देण्यात आले .सासरच्या लोकांकडून झालेल्या निर्दयी मारहाणीमध्ये विवाहिता गंभीर जखमी झाली आहे .फुलंब्रीच्या चौकावाडी येथे घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे घरगुती हिंसाचार आणि छळवणुकीमुळे छत्रपती संभाजीनगर हादरले आहे . पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच राज्यभरातून हुंड्यासाठी पैशांचा तगादा, घरगुती हिंसाचार, हुंड्यातून जन्माला आलेली अमानुष मारहाणीची प्रकरणे उघडकीस येत आहेत . या प्रकारांवर काय ठोस कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . (CrimeNews)
नेमके प्रकरण काय?
माहेरून पैसे घेऊन ये नाहीतर परिणाम भोग, असं म्हणत 30 वर्षीय विवाहितेला दोरीने बांधून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी येथे उघडकीस आली आहे. एवढ्यावरच न थांबता तिला शरीरावर चटके देण्यात आले. या अमानुष प्रकारात विवाहिता गंभीर जखमी झाली आहे. पीडित विवाहितेचा आरोप आहे की, पती अजीम अब्दुल शेख, नणंद शबाना निसार शेख, आणि रिजवाना इम्रान शेख यांनी शारिरीक व मानसिक छळ केला. माहेरून पैसे आणावेत, या कारणावरून तिला दोरीने घरात बांधून अमानुष मारहाण केली. मारहाणीच्या वेळेस शरीरावर चटके दिल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे.या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित तीघांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरू केला आहे.