Tara Tiger : ताडोबातून आलेल्या ताराचा सह्याद्रीत मुक्त संचार Special Report
Tara Tiger : ताडोबातून आलेल्या ताराचा सह्याद्रीत मुक्त संचार Special Report
काही दिवसांपूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून एका वाघिणीचं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करण्यात आलं होतं. हीच वाघीण सध्या चर्चेचा विषय ठरतेय. कारण चांदोली धरणाच्या जलाशयातून पोहत जात या वाघिणीनं साताऱ्याच्या पाटणमध्ये प्रवेश केलाय. या वाघिणीचा प्रवास सध्या कसा सुरु आहे? तिच्या स्थलांतरामागचा हेतून नेमका काय होता? पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट...
ही दृश्य कोणत्याही व्याघ्रसफारीतली किंवा ताडोबातली नाहीत...
तर ही दृश्य आहेत साताऱ्यातल्या ढेबेवाडीतली...
ताडोबाच्या जंगलातून सह्याद्रीच्या कुशीत आलेल्या तारा वाघिणीनं
एसटीतल्या प्रवाशांना चक्क असं दर्शन दिलं...
आणि अचानक तारा वाघिणीला बघून अनेकांच्या पोटात गोळा आला
तर अनेकांचे कॅमेरेही तिला टिपून घ्यायला सज्ज झाले...
साताऱ्याच्या पाटण तालुक्यातल्या ढेबेवाडी खोऱ्यात ताराचा हा मुक्तसंचार पाहायला मिळालाय.
माईंगडेवाडीवरून पाटणकडे एसटी जात असताना तारानं अचानक झुडूपातून उडी घेतली आणि एसटीची वाट अडवली...
मात्र ताराच्या अशा दर्शनानं सगळेच आश्चर्यचकीत झाले...
तर लोकांमध्ये भीतीचं वातावरणही पसरलंय.