Sandip Girhe On Chandrapur Mayor : भाजपसोबत का गेले? राजकीय गणितं कशी जुळली, संदीप गिऱ्हे EXCLUSIVE

Sandip Girhe On Chandrapur Mayor : भाजपसोबत का गेले? राजकीय गणितं कशी जुळली, संदीप गिऱ्हे EXCLUSIVE

Chandrapur Deputy Mayor Election 2026: चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तानाट्याचा मंगळवारी नाट्यमय शेवट झाला असतानाच, उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही मोठा थरार पाहायला मिळाला. उपमहापौर पदासाठी झालेल्या मतदानात काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे उमेदवार पप्पू देशमुख आणि भाजप समर्थित शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रशांत दानव (Prashant Danav) यांना समसमान 32-32 मते मिळाल्याने निवडणूक अडचणीत सापडली. अखेर ईश्वर चिठ्ठीने उपमहापौर पदाचा फैसला करण्यात आला.

उपमहापौर निवडणुकीपूर्वी एमआयएमचा एक नगरसेवक काँग्रेस समर्थित उमेदवार पप्पू देशमुख यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार मतदान झाल्यास दोन्ही उमेदवारांना समान मते मिळण्याची शक्यता होती आणि प्रत्यक्षात तसेच घडले. दोन्ही बाजूंना प्रत्येकी 32 मते मिळाल्याने सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Chandrapur Deputy Mayor Election 2026: ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव विजयी

नियमांनुसार मतांची बरोबरी झाल्यास ईश्वर चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी यांच्या उपस्थितीत ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. या चिठ्ठीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार प्रशांत दानव यांचे नाव निघाल्याने ते चंद्रपूर महानगरपालिकेचे नवे उपमहापौर म्हणून विराजमान झाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola