एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Chandrapur Land Dispute Suicide | परमेश्वर Meshram यांचा मृतदेह 3 दिवसांपासून शवगृहात, कुटुंबियांचे गंभीर आरोप
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करणारे परमेश्वर मेश्राम यांचा मृतदेह तीन दिवसांपासून शवगृहात आहे. कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. मेश्राम यांच्या मृत्यूला काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि त्यांचे सासरे अनिल धानोरकर जबाबदार असल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. शेतजमिनीचा सातबारा नावावर करणे, धानोरकर कुटुंबियांकडून ताबा मिळवून देणे आणि पोलीस संरक्षण देणे या प्रमुख मागण्या आहेत. चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शीतगृहात मृतदेह ठेवण्यात आला आहे. या प्रकरणावर अद्याप तोडगा निघालेला नाही. कुटुंबिय आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. तीन दिवस मृतदेह या ठिकाणी असल्यामुळे एक प्रकारे त्या मृतदेहाची विटंबनाच होत आहे, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. या भेटीनंतर काही मार्ग निघण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
























