Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

Continues below advertisement

Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या आठवड्यात चिखली मतदार संघाच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांचा वाढदिवस मित्रपरिवारानं बुलढाणा शहरात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी एक रॅली काढण्यात आली होती त्या रॅलीत "बाप तो बाप रहेगा...." अशा प्रकारे गाणंही वाजवण्यात आले होते. या गाण्यावर प्रसारमाध्यमांनी आ.संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया घेतली असता आ.संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, " बाप तो बाप है हे ठीक आहे. मात्र हे विधान एखाद्या पुरुषाने केलं तर चालेल मात्र एखाद्या बाईने म्हटलं बाप तो बाप आहे तर बापाचं शरीर आणणार कुठून....? " असा सवाल उपस्थित केला होता. हे विधान समाज माध्यमात व प्रसार माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. या विधानावर महिलांच्या लज्जेस धक्का पोहोचला असून महिलांच्या शरीर ठेवणीवर प्रहार करण्यात आला आहे असा आरोप करत संजय गायकवाड यांनी हे विधान हेतू पुरस्कर केल्याचं तक्रार करत एका 42 वर्षीय महिलेने आ.संजय गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मध्यरात्री आ. संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळं मात्र राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola