Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
तुम्ही जिवंत आहात... तरी देखील पोलीस दफ्तरी तुमची हत्या झालीय असं दाखवण्यात आलं तर? आणि त्या हत्येप्रकरणी तुमच्याच कुटुंबातल्या एका दोघांना अटक करून, जबरदस्तीनं हत्येचा कबुली जबाब नोंदवून घेतला तर? ... अन्यायाविरोधात ज्यांच्याकडे दाद मागायची असते, तेच पोलीस अन्याय करणारे असतील तर? हे प्रश्न म्हणजे कल्पनाविलास किंवा सिनेमाचं कथानक नाहीय... तर महाराष्ट्रात घडलेलं धक्कादायक वास्तव आहे... जिथे खाकी वर्दीतल्या गुंडांनी निष्पाप बाप-बेट्याला फासावर लटकवण्याची पूर्ण तयारी केली होती...मात्र त्यांचं बिंग फुटलं..महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातला हा स्पेशल रिपोर्ट पाहताना हातातली सगळी कामं बाजूला ठेवा..बातमी समजून घेताना डोकं थोडसं चक्रावून जाण्याची शक्यता आहे..बातमी पाहिल्यानंतर बुलढाणा पोलिसांबद्दल तीव्र संताप निर्माण झाल्यास स्वतःच्या रागावर ताबा ठेवावा..सर्वसामान्य नागरिकांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत... सर्वांनाच हादरवून सोडणारा आमचे प्रतिनिधी डॉ. संजय महाजन यांचा हा स्पेशल रिपोर्ट