Buldhana Bus Driver Drunk : मद्यधुंद बस चालकांचा खामगाव बसस्थानकात धिंगाणा!

Buldhana Bus Driver Drunk : मद्यधुंद बस चालकांचा खामगाव बसस्थानकात धिंगाणा!

राज्य परिवहन मंडळाची परतवाड्याहून पुण्याला निघालेल्या परतवाडा आगाराच्या शयनयान बस मधील चालक हा मध्य प्राशन करून बस चालवत असल्याची माहिती धावत्या बसमधील प्रवाशांनी "एबीपी माझा" ला दिली त्यावेळी बस ही खामगाव बस स्थानकात  पोहोचली होती. ही बस परतवाडा येथून पुण्याला निघाली होती. त्यावेळी परतवाडा आगारातीलच दोन बस चालक व दोन वाहक या बस मध्ये होते. यातील बस चालवणारा चालक व सहचालक हे दोघेही धावत्या बस मध्ये मध्ये धुंद अवस्थेत मद्यपान करत होते. या बस मध्ये मध्याच्या अनेक बॉटल्सही आढळल्या. चालक हा मध्य धुंद अवस्थेत होता तर जालन्याहून दुसरा चालक ही बस पुण्यापर्यंत चालवणार होता. तोही मध्य धुंद अवस्थेत बस मध्ये होता. तर दारूच्या बॉटल सही बस मध्ये आढळून आल्यात.  यावेळी या दोन्ही बस चालकांनी खामगाव बस स्थानकावर मोठा राडा घातला. यावेळी पोलिसांना ही पाचारण करण्यात आलं...आणि त्यामुळे बस ही दोन तास उशिराने पुण्याकडे रवाना झाली. यामुळे मात्र प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला. एबीपी माझा ने याप्रकरणी जाब विचारल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला त्यामुळे प्रवाशांनी एबीपी माझाचेही आभार मानले. यावेळी वृत्तांकन करत असताना एबीपी माझाच्या कॅमेरामन शांताराम तायडे यांच्यावर या मध्यधुंद चालकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola