Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला

Continues below advertisement

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात जे वातावरण होतं, ते वातावरण महाराष्ट्रात अनेक वर्ष राहिलं, मधल्या काळात मात्र काही गोष्टी झाल्या, त्याची चर्चा आता होऊ नये. मराठा वनाचा विषय माझ्या दृष्टीने आत्मीयतेचा विषय होता. तुम्ही माझ्या वरती प्रेम केलं, मधल्या काही दोन-तीन वर्षाचा विषय सोडला तर तुम्ही जेवढा जीव लावला त्याचे माझ्यावर उपकार आहेत. मधल्या दोन-तीन वर्षात काय झालं त्यामुळे माझ्या कर्तव्यात काही बदल होऊ शकला नाही. मी जात-पात धर्म सोडून राजकारण केलं आहे. पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला. असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलं. आमदार धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मराठा भवन (Maratha Bhawan Bhoomi Pujan) उभारणीसाठी तब्बल 28 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मराठा वनाला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठा युवा मंचकडून आमदार धनंजय मुंडे यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola