Beed Majalgaon|माजलगावमध्ये भर बाजारात तरुणाची हत्या, Babasaheb Aage या तरुणावर धारदार शस्त्रानं वार
Beed Majalgaon Babasaheb Age Death | माजलगावमध्ये भर बाजारात तरुणाची हत्या, बाबासाहेब आगे या तरुणावर धारदार शस्त्रानं वार
बीड जिल्ह्यात 15 दिवसांत तिसरी हत्या
माजलगावात भर दिवसा कोयत्याने वार करून खुन झालेला बाबासाहेब आगे होता भाजपाचा पदाधिकारी आगे हा भाजपचा बूथ विस्तारक म्हणून पाहत होता काम माजलगाव येथे काही वेळापूर्वी बाजार रस्त्यावर झालेल्या बाबासाहेब प्रभाकर आगे याची कोयत्याने हत्या झाल्याची घटना घडली होती.दरम्यान याबाबत आता आणखी एक माहिती समोर आहे.बाबासाहेब आगे हा भाजपचा बूथ विस्तारक म्हणून देखील काम पाहत असल्याची माहिती समोर आली आहे. बाजार रस्त्यावर बाबासाहेब प्रभाकर आगे वय 30 वर्ष हे आज दुपारी २ वाजण्याचा सुमारास उभे असताना आरोपी नारायण शंकर फपाळ याने आगेवर कोयत्याने सपासप वार केले यामुळे आगे ह्या जागीच मृत्यु झाला.घटनेनंतर आरोपी फपाळ स्वतः माजलगाव येथील पोलीस ठाण्यात कोयत्यासह हजर झाला.यावेळी त्याने या घटनेबाबतची कबुली पोलिसांना दिलीय. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून या घटनेचा तपास माजलगाव पोलिस करत आहेत.गेल्या पंधरा दिवसातील खुनाची ही तिसरी घटना आहे.आधी सिरसाळा,नंतर अंबाजोगाई आणि आता माजलगाव येथे झालेल्या खुनाच्या घटनेने जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला दिसून येत आहे.