Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | १४ वर्षांच्या नातीला 2 लाखात विकलं, तरुणीचा आता पतीकडून छळ, लैंगिक अत्याचार

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | १४ वर्षांच्या नातीला 2 लाखात विकलं, तरुणीचा आता पतीकडून छळ, लैंगिक अत्याचार

14 वर्षाच्या नातीला आजी-आजोबांनी विकले.. संभाजीनगरमधली धक्कादायक घटना
जानेवारी 2025 मधे आजी आजोबांनी 14 वर्षांच्या मुलीचं 25 वर्षांच्या तरूणासोबत लग्न लावून दिलं.
त्यानंतर पतीच्या लैंगिक त्रासामुळे मुलीची पोलिसांकडे याचना,दामिनी पथकाने केली मुलीची सुटका
मुलगा, मुलाचे आईवडील आणि मुलीचे आजीआजोबा या सगळ्यांविरोधात बालविवाहाचा गुन्हा दाखल


मुलगी दहा वर्षांची असताना तिचे वडील वारले आणि आई तिला सोडून गेली...
आजी-आजोबा आणि काका यांना ति नकोशी झाल्याने ती नववीत असताना त्यांनी जानेवारी 2025 मधे देवळाई परिसरातील एका कुटुंबाकडून 2 लाख रूपये घेऊन तिचं लग्न त्यांच्या 25 वर्षीय मुलासोबत लग्न लावून दिलं
त्यानंतर गेले दोन महिने तिचा पती तिचा शारिरिक छळ करत होता..शरीरसंबंधासाठी जबरदस्ती करत होता...त्याचा त्रास असह्य होऊन तिने पोलिसांकडे मदत मागितली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola