Aurangabad Traffic : 11फेब्रुवारीपर्यंत दंड भरा, अन्यथा कोर्टात हजर व्हा,अडीच लाख वाहनचालकांना नोटीस
abp majha web team
Updated at:
04 Feb 2023 12:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाहन नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई केल्यानंतर दंड भरण्यावरून होणारे वाद लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून आता ई-चलानद्वारे कारवाई येत आहे. मात्र ई-चलानद्वारे कारवाई करून देखील दंड न भरणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे औरंगाबाद (Aurangabad) पोलिसांनी आता अशा वाहनधारकांना दंड भरण्यासाठी नोटीस पाठवल्या असून, 11 फेब्रुवारीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लोक अदालतमध्ये हजर राहण्याचे कळवले आहे. मात्र एकाचवेळी 2 लाख 40 हजार 768 वाहनधारकांना हजर राहण्याची नोटीस देण्यात आल्याने चर्चेचा विषय बनला आहे. तर यामुळे 11 तारखेला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लोक अदालतमध्ये मोठी गर्दी उसळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.