Aurangabad Ganpati : फुल आणि मखर खरेदीसाठी लगबग, गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठा फुलल्या
Continues below advertisement
आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास उरलेयत... आणि आता याचाच उत्साह राज्यभरातल्या बाजारपेठांमध्येही दिसून येतोय... गणरायाच्या आगमनासाठी राज्यभरातल्या बाजारपेठा या भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्यात... गणरायाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आलीय.. पुजेसाठी लागणारी फुलं आणि हार खरेदी करण्यासाठी भक्तांची गर्दीच गर्दी बाजारपेठांमध्ये दिसून येतेय... कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर यंदा निर्बंधमुक्त असा गणेशोत्सव साजरा होत असल्यानं मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण दिसून येतंय...
Continues below advertisement