Ahmednagar Temple Dress Code : अहमदनगर शहरातील 16 मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू
abp majha web team | 03 Jun 2023 10:31 PM (IST)
राज्यातील अनेक मंदिरांमध्ये वस्रसंहिता म्हणजेच ड्रेसकोड लागू केले जात आहेत. आता अहमदनगर शहरातील १६ मंदिरांमध्येही ड्रेसकोड लागू करण्यात आलाय. यात अहमदनगर शहरातील ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिराचा समावेश आहे. या मंदिरांमध्ये आजपासूनच ड्रेस कोड लागू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मंदिर महासंघाचे सुनील घनवट यांनी दिलीय.