VVPAT | 21 विरोधी पक्षांना झटका, VVPAT पडताळणीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली | नवी दिल्ली | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 May 2019 04:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लोकसभा निवडणुकीत मतांचं व्हीव्हीपॅटसोबत पडताळणीची मागणी करणाऱ्या 21 विरोधी पक्षांना सर्वोच्च न्यायालयाने झटका देत त्यांची याचिका फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाने आज (7 मे) विरोधी पक्षांची फेरविचार याचिका फेटाळली, ज्यात 50 टक्के मतांची व्हीव्हीपॅटसोबत पडताळणी करण्याचा आदेश निवडणूक आयोगाला द्यावा, मागणी केली होती. मागील आदेशात सुधारणा करण्याची आवश्यकता वाटत नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. टीडीपी आणि काँग्रेससह 21 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीसाठी चंद्राबाबू नायडू, डी. राजा, संजय सिंह आणि फारुख अब्दुल्ला सुप्रीम कोर्टात उपस्थित होते. विरोधी पक्षांकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी बाजू लढत होते. "आम्हाला कोर्टाच्या निर्णयाचा आदर आहे, आमची याचिका ईव्हीएमबाबत नाही, तर व्हीव्हीपॅटबाबत होती," असं अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.