नवी दिल्ली : जस्टीस लोया मृत्यू प्रकरणाची आज सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी
Continues below advertisement
न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या खटल्याची सुनावणी यापुढे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होणार आहे. या खटल्याची सुनावणी आधी न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्यासमोर सुरु होती.
सोमवारच्या सुनावणी यादीनुसार, हा खटला कोर्ट 1 मध्ये 45 क्रमांकावर आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रांसोबत न्यायमूर्ती एएम खानविलकर आणि डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर या खटल्याची सुनावणी होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाच्या चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टाच्या प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यावेळी या चारही न्यायमूर्तींनी अशीही तक्रार केली होती की, कनिष्ठ न्यायमूर्तींना महत्त्वाच्या केस दिल्या जातात. या वादामध्ये न्यायाधीश लोया यांच्या खटल्याची देखील चर्चा झाली होती.