नवी दिल्ली : मोदी 'नीच', मणिशंकर अय्यर यांची जीभ घसरली, टीकेनंतर माफीनामा
Continues below advertisement
‘चहावाला पंतप्रधान बनू शकत नाही’ असे म्हणत राजकीय वाद निर्माण करणाऱ्या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अपशब्द वापरले आहेत. मोदींना उद्देशून ‘नीच’ असा शब्द मणिशंकर अय्यर यांनी वापरला. मोदींनी अय्यर यांना प्रत्युत्तर दिले असून, राहुल गांधींनीही अय्यर यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करत माफीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
Continues below advertisement