नवी दिल्ली : 'फेक न्यूज' प्रकरणी पत्रकारांवरील कारवाईचा निर्णय मागे
Continues below advertisement
फेक न्यूज' संदर्भात काढण्यात आलेलं प्रसिद्धीपत्रक मागे घेण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. 'प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया'च्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. फेक न्यूज दिल्यास पत्रकाराची अधिस्वीकृती रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
Continues below advertisement