नवी दिल्ली : पी चिदंबरम यांच्या मुलाच्या संपत्तीवर ईडीचे छापे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jan 2018 02:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम याचा मुलगा कार्ती याच्या पाच घरांवर आज सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. महत्वाची बाब म्हणजे यावेळी कार्ती यांचे वडील आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम उपस्थित होते. एअरसेल-मॅक्सिस व्यवहारात अनियमितता आढळल्याने ईडीने दिल्ली आणि चेन्नईतल्या पाच संपत्तीवर ही छापेमारी केली आहे. याआधीही ईडीने कार्ती चिदंबरमच्या दिल्ली आणि चेन्नईतल्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यानंतर आज सकाळीच पुन्ही ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या छाप्यात ईडीच्या हाती काही लागलं नसल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हटलंय