Ganesh Naik | राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Sep 2019 10:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या 11 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता गणेश नाईक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गणेश नाईंकांसोबत नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीचे 55 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कोकण आयुक्तांची भेट घेत उद्या वेगळा गट स्थापन करण्याबाबत तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात येणार आहेत. वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेत हा भाजप प्रवेश होणार आहे, अशी माहिती आहे.