Vegetable price hike | पावसामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले | नाशिक | ABP Majha
Continues below advertisement
गेले काही दिवस सुरु असलेल्या पावसाचा फटका भाजीपाल्याला बसलाय. भाजीपाला सडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तर, दुसरीकडे भाज्यांच्या वाढत्या दरामुळे सामान्यांचं बजेट कोलमडलंय. नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला मुंबईत आणि इतर शहरांत जातो. सध्या नाशिकमधल्या पावसानं या भाजीपाल्याचे दर गगनाला भिडलेत. जो टोमॅटो नाशिकमध्ये 50 रुपये किलो दरानं विकला जातोय..तोच, मुंबईत 100 रुपये किलो झालाय. इतर भाज्यांच्या दरातही किलोमागे 15-20 रुपयांची वाढ झालीये.
Continues below advertisement