नाशिक : अंतर्गत कलहातून भाजप नगरसेवकांच्या गाड्यांची तोडफोड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Apr 2018 09:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अंतर्गत कलहातून दोन नगरसेवकांच्या गाड्यांची तोडफोड केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी एक जण पोलिस अधिकाऱ्याचा तर दुसरा शिक्षण विभागातील विस्तार अधिकाऱ्याचा मुलगा आहे. तोडफोड केलेली वाहनं ही भाजप नगरसेवकांची आहेत. तोडफोड प्रकरणातील मुख्य सूत्रधार मात्र अद्याप फरार आहे.