नाशिक : आर्टिलरी सेंटर परिसरातील रस्ते लष्कराकडून बंद
Continues below advertisement
नाशिक शहराला लागुन असलेल्या देवळाली कॅम्पमध्ये नागरिकांची सुविधा की आर्टिलरी सेंटरच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. देवळाली कँप मुख्यत: लष्करी भाग असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आर्टिलरी सेंटरच्या आजुबाजूचे 8 ते 9 रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. त्याचा त्रास स्थानिकांना होत आहे. त्यामुळे लष्कराच्या या निर्णयाविरोधात नागरिकांनी देवळाली कँप छावणी परिषदेवर मोर्चा काढला. या मोर्च्यात अनेक नागरिक सहभागी झाले होते.
Continues below advertisement