नालासोपारा : महावितरणच्या सबस्टेशनवर केबलचा स्फोट, 9 कर्मचारी भाजले

Continues below advertisement
नालासोपाऱ्यात महावितरण विभागाच्या सबस्टेशनवर केबलचा स्फोट झाल्याने 9 कर्मचारी भाजले आहेत. यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर नालासोपारा येथील अलायन्स आणि वसईतील गोल्डन पार्क रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धणीवबाग परिसरातील आचोळा सबस्टेशनमध्ये दुपारी केबल तपासणीचं काम सुरु होतं. यावेळी केबलमध्ये अचानक स्फोट झाला. हा स्फोट एवढा जबरदस्त होता की यात नऊ कामगार भाजले. यानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एेरणीवर आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram