नागपूर : पोलीस अधिकारी विरुद्ध लोकप्रतिनिधी सामना!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jul 2018 03:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांचं निलंबन करण्यात आलंय. यासाठी आज विधानसभेत विशेष हक्कभंग मांडण्यात आला. त्याला सर्व पक्षीयांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर जाधव यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले. एका अज्ञात व्यक्तीशी फोनवरुन बोलत असताना महावीर जाधव यांनी भुजबळांना आर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे, जाधवांचं निलंबन झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले. जाधव यांच्या प्रमाणे ज्योतिप्रिया सिंह यांच्यावर कारवाई करा अशी मागणी तर आमदार नागेश पाटीलही या मुद्द्यावरुन आक्रमक झाले.