नागपूर : गीतेचा श्लोक म्हणताना जितेंद्र आव्हाडांना घाम फुटला
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना नसती उठाठवे चांगलीच महागात पडली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भगवदगीता वाटपावरुन भाजपवर टीका करताना आव्हाड यांनी आपल्याला गीतेचे श्लोक तोंडपाठ असल्याचा दावा केला. मग तिथं उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने श्लोक म्हणण्याचा आग्रह धरला. पण आव्हाडांना गीतेचा श्लोक काही पूर्ण करता आला नाही. आपली अडचण होते हे लक्षात आल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी पत्रकाराला उलटप्रश्न विचारुन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.
Continues below advertisement