नागपूर : गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे महाराष्ट्राचे नीरव मोदी, धनंजय मुंडेंचा घणाघात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2018 06:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्राचे नीरव मोदी असल्याचा घणाघात विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केला.
गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावे पाच हजार पाचशे कोटींचं कर्ज घेतल्याचाही गंभीर आरोप मुंडेंनी केलाय. तसंच गुट्टे यांनी साडेसात हजार कोटींचा घोटाळा केल्याचंही ते म्हणालेत. ९ जिल्ह्यातील २६ हजार शेतकऱ्यांच्या नावे हे कर्ज उचलण्यात आलं, त्यात एका शेतकऱ्याच्या नावे ४० ते ५० लाख उचलले. इतकंच नाही तर न्यायमूर्तींच्या मयत भावाच्या नावानंही बनावट कर्ज घेतल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय.