नागपूर: 72 हजार पदांसाठी नोकर भरती, मराठा समाजासाठी 16 टक्के जागा राखीव
Continues below advertisement
राज्यात 72 हजार पदांसाठी नोकर भरती होणार आहे. त्यात मराठा समाजासाठी 16 टक्के जागा राखीव ठेवल्या जातील. आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बॅकलॉग भरला जाईल. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज विधानपरिषदेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते
मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकारच्या अखत्यारित नाही तर कोर्टाच्या अखत्यारित आहे. असं सांगायलाही ते विसरले नाहीत. कालपासून परळी, बीड, वाशीमध्ये मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ही घोषणा महत्वपूर्ण आहे.