मुंबई : भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणाऱ्या नगराध्यक्षांना चाप बसणार, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार

Continues below advertisement
राज्यातील नगरपालिका अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भात कायद्यातील विशिष्ठ तरतुदीत बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. यामुळे भ्रष्ट मार्गांचा अवलंब करणाऱ्या नगराध्यक्षांना मोठा चाप बसणार आहे.  नगराध्यक्ष भ्रष्ट मार्गांचा अंबलंब करत असेल तर त्याविरोधात सदस्यांनी अविश्वास ठराव आणताना जे आरोपपत्र दाखल केलं असेल त्याची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एक महिन्याच्या हात चौकशी करण्यात येणार आहे. या आरोपात तथ्य आढळल्यास प्रस्ताव सरकारकडे पाठवून संबंधित नगराध्यक्षाला अपात्र ठरवण्य़ाची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram