सोलापूर : राज ठाकरे म्हणजे बुझा हुआ दिया : वारिस पठाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Dec 2017 11:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवरुन मनसे आणि काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या वादात आता एमआयएमने उडी घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा असल्याची टीका एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केली आहे. हिंमत असेल, तर भायखळ्यात येऊन तोडफोड करा, मग तुम्हाला दाखवतो, असं आव्हान एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी राज ठाकरेंना दिलं आहे.