खड्ड्यांचे अड्डे : मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानंतर वडाळ्यातील रस्त्यांचा रिअॅलिटी चेक
Continues below advertisement
मुंबईतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. बहुतांश भागात रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे मुंबईत रस्ता नावाची संकल्पना अस्तित्वात आहे का असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. सध्या मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांची सरासरी संख्या लाखोंच्या घरात नक्कीच आहे. मात्र अद्यापर्यंत 4 हजार 400 खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. त्यानंतर त्यानंतर आज माझानं मुंबईतल्या रस्त्यांची पडताळणी सुरु केलीय. खड्ड्यांमध्ये थोडे थोडे रस्ते शोधत चालणारे आणि वाहन चालवणारे मुंबईकर यातून कसाबसा मार्ग काढताना आम्हाला दिसलेत.
Continues below advertisement