मुंबई : राज्यपालांच्या भाषणाचा गुजराती अनुवाद, विरोधकांचा आरोप, विनोद तावडेंचं उत्तर
Continues below advertisement
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलेल्या भाषणाच्या अनुवादावरुन गदारोळ बघयाला मिळाला. यावेळी आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाला असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला. या सगळ्या प्रकारानंतर विधानसभेत गदारोळ झाला. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची माफी मागितली. तर राज्यपालांचं भाषण सुरु झाल्यानंतर मराठी अनुवाद येते नाही हे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या लक्षात आलं. त्यानंतर नियंत्रण कक्षात जाऊन स्वता तावडेंनी मराठी अनुवाद केला.
Continues below advertisement