मुंबई : विनोद कांबळी आणि पत्नी एन्ड्रियाविरुद्ध मारहाणीची तक्रार
Continues below advertisement
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि त्याची पत्नी एन्ड्रिया विरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईमधल्या एका कुटुंबाने पोलिसात कांबळी दाम्पत्याविरुद्ध ही तक्रार केली आहे. तिथे खरेदीसाठी आलेल्या राजेंद्र कुमार यांचा हात चुकीनं विनोद कांबळींच्या पत्नी एन्ड्रियाला लागला. यावेळी चिडलेल्या एन्ड्रियानं राजेंद्र कुमार यांना मारहाण केली. मॉलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही दृश्यं कैद झाली आहेत.
Continues below advertisement