मुंबई : सिद्धिविनायका चरणी अर्पण 2.4 किलो दागिन्यांचा लिलाव
Continues below advertisement
दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दागिन्यांचा लिलाव करण्यात आला. यंदा लिलावासाठी 2 किलो 421 ग्रॅमचे 266 विविध प्रकारचे दागिने ठेवण्यात आले होते. यात श्रीगणेच्या मूर्ती, मोदक, मुकूट, उंदीर, चेन, अंगठ्या, कंठ्या, यासह विविध दागिण्यांच्या लिलावात समावेश होता. अनेक भाविकांनी या लिलावाला उपस्थिती लावून दागिने खरेदी केलेत. सिद्धिविनायकच्या चरणी भक्त अर्पण करत असलेल्या सोन्याचांदीच्या विविध वस्तूंचा लिलाव मंदिर न्यासातर्फे केला जातो. यंदाच्या वर्षातला हा तिसरा लिलाव होता. या लिलावातून सिद्धीविनायक ट्रस्टला 25 ते 30 लाख रुपये मिळण्य़ाचा अंदाज आहे.
Continues below advertisement