मुंबई : 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ होणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Mar 2018 10:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतल्या 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तशी माहिती दिली आहे. महापालिकेत प्रस्ताव मंजूर झाल्यास याची अंमलबजावणीही करण्यात येईल.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवेळी शिवसेनेच्या वचननाम्यात 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ होण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आता थेट मुख्यमंत्र्यांनी 700 फुटांच्या घरांवर मालमत्ता कर माफीची घोषणा केल्यानं भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई पुन्हा रंगू शकते.