मुंबई : उद्धव ठाकरेंशी अमित शाहांच्या भेटीचं कारण 'संपर्क फॉर सपोर्ट' अभियान : रावसाहेब दानवे
Continues below advertisement
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय विरोधकांच्या एकजुटीचा सत्ताधारी भाजपने चांगलाचा धसका घेतलाय. कारण भाजप नेत्य़ांनी आता आपल्या मित्र पक्षांना गोंजारायला सुरुवात केलीय. शिवसेनेसोबतचा तणाव टोकाला गेला असतानाही भाजप अध्यक्ष अमित शाह उद्या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. संध्याकाळी 7.30 वाजता दोघांची भेट होईल. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीमुळे भुवया उंचावल्या आहेत. भाजपच्या मित्रांमधला शिवसेना सर्वात मोठा पार्टनर आहे. मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये विळ्या-भोपळ्याचं वैर काही लपून राहिलेलं नाहीय.
Continues below advertisement