मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणाचा थेट गुजरातीमध्ये अनुवाद, विरोधकांचा आक्रमक पवित्रा
Continues below advertisement
आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलेल्या भाषणाचा अनुवाद आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाला. त्यानंतर लगेच शिक्षणमंत्री विनोद तावडे सतर्क झाले आणि त्यांनी विधानसभेच्या नियंत्रण कक्षात जाऊन स्वत: तावडेंनी मराठी अनुवाद करायला सांगितलं. पण तोपर्यंत विरोधक चांगलेच आक्रमक झाले. आणि त्यांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी सुरु केली.
Continues below advertisement