मुंबई : कांगा लीग क्रिकेट स्पर्धेत पार्कोफिनला 'अ' गटाचं विजेतेपद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Oct 2017 11:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
माजी रणजीवीर राजेश पवारच्या नेतृत्त्वाखालील पार्कोफिन क्रिकेट क्लबनं कांगा लीग क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाचं विजेतेपद पटकावलं आहे. मुंबई क्रिकेटमध्ये कांगा लीग ही सर्वोच्च प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. पार्कोफिननं फोर्ट विजय क्रिकेट क्लबविरुद्धचा अखेरचा सामना अनिर्णीत राखला. पार्कोफिननं यंदाच्या मोसमात सर्वाधिक दहा गुणांची कमाई केली. पय्याडे स्पोर्टस क्लबला नऊ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.