मुंबई : मनसेचा फेरीवाल्यांविरोधात मोर्चा, घोषणाबाजी करणाऱ्यांवर कारवाई
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Oct 2017 01:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज ठाकरेंनी इशाऱा दिल्यानंतर मुंबईतल्या अनेक स्टेशन बाहेर फेरीवाले कायम आहेत. त्याविरोधात आज मनसेनं मोर्चाचं आयोजन केलं होतं. दादर परिसरात या मोर्चाला सुरुवात झालीय.दादर सुविधा शॉपिंग सेंटर ते केशव सूत उड्डाणपुलाभोवती फ्लॅग मार्च काढला आणि फेरीवाले, रेल्वे आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलंय. आणि शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत.