Assembly Election 2019 | आदित्य ठाकरेंविरोधात मनसे वरळीतून निवडणूक लढवणार नाही? | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Oct 2019 11:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्रातील राजकारणात काका आणि पुतण्या संबंध सर्वश्रुत आहेत. पण मुंबईतील काका पुतण्याच्या मदतीला धावण्याची शक्यता आहे. कारण वरळी मतदारसंघातून पुतण्या आदित्य ठाकरेंनी मैदानात उतरण्याची घोषणा केली. त्यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आदित्यला मदत करण्याची शक्यता आहे. कारण वरळी मतदारसंघात मनसे उमेदवार उभा करणार नाही, अशी शक्यता आहे. असं झालं तर याचा आदित्य ठाकरेंना फायदा होऊ शकतो. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील पुढच्या पिढीला राज ठाकरे मदत करताना दिसतील. याबद्दलचा अधिकृत निर्णय आज संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे.