मुंबई : 'माझा'ने आदिवासी क्रीडा प्रबोधिनीची बिकट अवस्था दाखवल्यानंतर आमदार आक्रमक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Mar 2018 07:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नाशिकमधल्या आदिवासी क्रीडा प्रबोधिनीची बिकट अवस्था एबीपी माझाने दाखवल्यानंतर आता आमदार आक्रमक झाले आहेत. आणि त्यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांवरही टीकेची झोड उठवली आहे. खरंतर आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत राज्यातली पहिली क्रीडा प्रबोधिनी नाशिकमध्ये सुरू करण्यात आली होती. मात्र तिथे असणाऱ्या सेवा सुविधांची अवस्था अत्यंत भीषण असलेली पाहायला मिळत आहे. त्याबद्दल आक्रमक भूमिका घेत आदिवासी विद्यार्थ्यांना सुविधा न मिळाल्यास आंदोलन करण्याची भूमिका आमदारांनी घेतली आहे.