मुंबई : ओखी वादळचा फटका, हवामान विभागाचे के एस होसळीकर यांचं विश्लेषण
Continues below advertisement
मुंबईसह कोकणच्या समुद्र किनाऱ्यांनी रौद्ररुप धारण केल्याने लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह अनेक ठिकाणी काल रात्री मोठ्या लाटा उसळल्या. मात्र पाण्याची वाढलेली पातळी ही उधाणामुळे होती की ओखी वादळामुळे यावरुन कोकणात संभ्रम निर्माण झाला आहे. सिंधुदुर्गात प्रामुख्याने मालवण, वेंगुर्ले, देवगड किनाऱ्याला या लाटांचा तडाखा बसला आहे. तर रत्नागिरी किनाऱ्यालगतच्या अनेक गावांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसळीकर यांचं विश्लेषण
Continues below advertisement