मुंबई : झाकीर नाईकच्या याचिकेवर हायकोर्टाचा संताप
Continues below advertisement
झाकीर नाईक सारख्यानं दाखल केलेली याचिका ऐकण्यात आम्हाला स्वारस्य नाही. या शब्दांत हायकोर्टानं आपला संताप व्यक्त केलाय. ईस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईकनं मुंबई उच्च न्यायालयात त्याच्याविरोधात दाखल केलेलं आरोपपत्र रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. परागंदा झालेली व्यक्ती अश्याप्रकारे याचिका दाखलच कशी करु शकते? असा सवाल उपस्थित करत हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावण्याचे संकेत दिले आहे.
Continues below advertisement