मुंबई : गोरेगावहून थेट पनवेल लोकल सेवा लवकरच सुरु होणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Dec 2017 11:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरीपर्यंतच्या हार्बर मार्गाचा लवकरच गोरेगावपर्यंत विस्तार होणार आहे. त्यामुळं सध्या अंधेरी ते पनवेल अशा चालणाऱ्या फेऱ्या गोरेगावहून सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. पश्चिम उपनगरातील प्रवाशांना आता थेट पनवेलला जाणं सुसह्य होणार आहे. सध्या सीएसएमटी ते अंधेरी मार्गावर 91 फेऱ्या चालविल्या जात आहेत. हार्बर मार्गावर यापूर्वी अंधेरीपुढे कोणतीही मार्गिका उपलब्ध नव्हती.