मुंबई : कचरा प्रक्रियेसंदर्भात मुंबईतील इमारतींना नवी डेडलाईन, भाजप-सेनेत खडाजंगी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Sep 2017 11:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात मुंबईतल्या इमारतींना देण्यात आलेली 2ऑक्टोबरची डेडलाईन वाढवून देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. या संदर्भात नवीन परिपत्रक काढून मुंबईकरांना नवीन डेडलाईन जाहीर करण्यात येईल. दरम्यान आजच्या मुंबई महापालिकेच्या सभेत कचरा उचलण्याच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. कचरा न उचलल्यास वॉर्ड ऑफिसमध्ये कचरा टाकण्याचा इशारा भाजपनं दिला. तर शिवसेनेनं आयुक्तांच्या घरासमोर कचरा टाकण्याचा इशारा दिला. या गदारोळानंतर काँग्रेस आणि भाजपनं सभात्याग केला.