मुंबई : स्थानिक, कोकणवासियांचं हित बघून निर्णय घेऊ, नाणार प्रकल्पावरुन मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याची विनंती शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. स्थानिकांचं मत आणि कोकणवासियांचं हित लक्षात घेऊन सरकार निर्णय घेईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आज मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सोमवारी नाणार प्रकल्पातील भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली होती. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं. पण आता शिवसेनेनं सामोपचाराची भूमिका घेतली आहे.
Continues below advertisement