मुंबई : विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात ख्रिस्ती समाजाचं आंदोलन
Continues below advertisement
ख्रिस्ती समाजबांधवांच्या विविध मागण्यांसाठी ओमेगा ख्रिश्चन महासंघ मुंबईत आझाद मैदानात धरणे आंदोलन करत आहे. मदर तेरेसांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, समाजासाठी कब्रस्थानाची सुविधा, चर्चवर हल्ले करणाऱ्यांच्या विरोधात अजामिनपात्र गुन्ह्याची तरतूद, तत्काळ ओबीसी वैधता प्रमाणपत्र आणि विधीमंडळात ख्रिश्चन समाजासाठी 5 राखीव जागांची तरतूद अशा त्यांच्या मागण्या आहेत. या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं आहे. मात्र सरकार यात चालढकल करत असल्याचा आरोप ख्रिश्चन संघटनांनी केला आहे. त्या पावसाळी अधिवेशनापर्यंत ठोस आश्वासन न मिळाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा महासंघाने दिला आहे.
Continues below advertisement