मुंबई : जुहूवरुन उड्डाण ते घाटकोपरमध्ये विमान कोसळलं, नेमकं काय घडलं?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jun 2018 07:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील चार जण आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. या विमानात पायलट आणि 3 तंत्रज्ञ असे एकूण चार जण होते. यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता. या चौघांचा आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
पायलट मारिया कुबेर, को पायलट प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी, मनीष पांडे यांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही या अपघातात दुर्दैवी अंत झाला.
चाचणीसाठी दुपारी दीडच्या सुमारास जुहू हेलिपॅडवरुन या विमानाने उड्डाण केलं. मात्र घाटकोपरपर्यंत पोहोचताच दुर्घटनाग्रस्त झालं आणि भर वस्तीत कोसळलं.