मुंबई : अधिवशेनात आक्रमक व्हा, उद्धव ठाकरेंचे सेना आमदारांना आदेश
Continues below advertisement
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक व्हा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्री आणि आमदारांना दिले आहेत. मुंबईतील ‘ट्रायडंट’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची बैठक पार पडली.
नाणार प्रकल्प, सातवा वेतन आयोग, शेतकऱ्यांची कर्जमाफी या विषयांवर सरकारला धारेवर धरण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिल्या आहेत. तसेच, लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावाची यादी जाहीर करण्याची मागणी करण्यासही सांगितले.