MPSC च्या भोंगळ कारभाराविरोधात मुंबईत विद्यार्थ्यांचा ‘आक्रोश’
Continues below advertisement
स्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रियेविरोधात मुंबईत आज विद्यार्थी ‘आक्रोश मोर्चा’ काढणार आहेत. महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांपासून विविध विभागातील रिक्त पदे भरली गेलेली नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात राज्यातील सर्व विद्यार्थी संघटना एकत्र येणार आहेत.
याआधी एमपीएससी विद्यार्थ्यांनी याच प्रकारचा मोर्चा औरंगाबादमध्ये काढला होता. औरंगाबादमधील मोर्चात हजारोंच्या संख्येत विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर 8 फेब्रुवारीला पुण्यातही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला.